| मेलबर्न | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मद रिझवान वादग्रस्तरित्या बाद झाला होता. आधी मैदानावरील पंचांनी रिझवानला नाबाद ठरवलं होतं. मात्र तिसऱ्या पंचांनी चेंडू रिस्ट बॅडला लागून गेल्याचं सांगत त्याला बाद ठरवलं होतं. यावर रिझवानने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.पासीबी चेअरमन झाका अश्रफ यांनी क्रिकेट संचालक मोहम्मद हाफीजसोबत चर्चा केली असून मेलबर्नमध्ये पंचगिरी आणि ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर झाला हा मुद्दा ते आयसीसीत घेऊन जाणार आहेत. हाफीज पुढे म्हणाला की, मी खेळात तंत्रज्ञान वापरण्याच्या विरूद्ध नाही. मात्र जर यामुळे शंका आणि गोंधळ निर्माण होत असले तर ते मान्य नाही. काही निर्णय हे समजण्यापलीकडचे होते. जर चेंडू स्टम्पला हिट करत असेल तर फलंदाज कायम बाद असतो. मला कळत नाही की अंपायर्स कॉल तिथे का आहे.