। उरण । वार्ताहर ।
सखाराम पाटील विकास मंच ओम साई राम मित्र मंडळ कामोठे आयोजित कामोठे ते साई मंदिर वहाल पालखी सह पदयात्रा सोहळा कुणाल भेंडे, बाबासाहेब दिघे, यश झेंडे, कणवेश म्हात्रे, सौरभ सलीस्तेकर आदी साई भक्तांच्या नियोजनाखाली संपन्न झाला.
यावर्षी वाजत गाजत वारी झाली. त्यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता. सेक्टर 6 साईबाबा मंदिर येथे आरती करून पालखी दिंडीला कामोठे येथून सुरूवात झाली. या पालखीला भेट देण्यासाठी मंदिराचे संस्थापक सखाराम पाटील, कामोठे शहरातील मा.नगरसेवक शंकर म्हात्रे, मा. नगरसेवक प्रमोद भगत, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील भेंडे, अमोल शितोले महाराज, हरिओम जाधव आदी मित्र परिवार उपस्थित होते. यावेळी झालेल्या साईबाबांच्या भंडार्याला कोकण शिक्षण मतदार संघाचे आ.बाळाराम पाटील, सखाराम पाटील, शंकर म्हात्रे, प्रमोद भगत, सुनील भेंडे, अमोल शितोले, बंडू सुरते आदींनी भेट दिली.