पाली चार प्रभागांची आरक्षण सोडत

पाली/बेणसे | प्रतिनिधी |
ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने पाली नगरपंचायतच्या 4 प्रभागांसाठी नवीन आरक्षण सोडत गुरुवारी (दि.23) येथील पाली तहसील कार्यालयात जाहीर झाली. यावेळी प्रभाग क्रमांक 2 व 14 साठी सर्वसाधारण महिला आणि प्रभाग क्रमांक 5 आणि 8 साठी सर्वसाधारण खुला असे आरक्षण पडले आहे.
येत्या 18 जानेवारीला ही निवडणूक होणार आहे. यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत बुधवारी (ता.29) ते सोमवार (ता.3) आहे. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी दिली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार दिलीप रायण्णावार, सीईओ अंगाई साळुंखे, जिप सदस्य सुरेश खैरे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version