| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याची ग्रामदेवता जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराजांचा चैत्र पालखी सोहळा शुक्रवार, दि. 7 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता सुरु होणार आहे. यानिमित्ताने सर्व ग्रामस्थांना व भाविकांना जोगेश्वरी मातेचे दर्शन घरोघरी होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पालखी सोहळा पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागत असल्याने सर्वत्र एक चुकीचा संदेश जात असून, वेगळी चर्चा होताना दिसते. त्यामुळेच ग्रामदेवतांची पालखी लवकरात लवकर व नियोजित वेळेत मंदिरात परतण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन जोगेश्वरी माता देवस्थानच्या उत्सव समितीकडून करण्यात आले.
श्री जोगेश्वरी माता मंदिरात गुढीपाडवाच्या दिवशी सायंकाळी 4.30 वा. घेण्यात आलेल्या पालखीच्या नियोजनाच्या संदर्भातील या बैठकीला श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन, सचिव भाई टके, हरेष काळे, विलास चौलकर, श्री जोगेश्वरी माता देवस्थान उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन राऊत, उपाध्यक्ष रुपेश नागोठणेकर सचिव मंगेश कामथे, सहसचिव संजय नांगरे, खजिनदार प्रथमेश काळे, सहखजिनदार सुदर्शन कोटकर, देवीचे भक्त मधुकर पोवळे, नारायण तेलंगे, आप्पा रावकर, तिरत पोलसानी, विजय नागोठणेकर, अनिल नागोठणेकर, विनोद अंबाडे, बाळाराम पोटे, किरण लाड, राजा गुरव, ग्रा.पं.सदस्य राजेश पिंपळे, दिनेश घाग, अरुण गुरव आदींसह उत्सव समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.