पेणमध्ये शेतीचे पंचनामे सुरु

| पेण | प्रतिनिधी |

मागील आठवडाभर कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले असून हजारो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेली होती. त्यामुळे भात पिकेे कुजण्याच्या मार्गावर आहेत. याच सर्व परिस्थितीचा विचार करून आजपासून पेण तालुक्यात कृषी, महसूल आणि पंचायतसमिती विभागाने पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे. तालुक्यातील जवळपास 80 टक्के नागरिक हे शेती, मासेमारी व गणपती व्यवसाय यावर आपली उपजीविका करतात. मात्र मागील आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील खारेपाट भागातील शेतकऱ्यांची शेती ही पाण्याखाली गेली तसेच पुर झाल्याने शेत तळी ओव्हर फ्लो झाली तर कारखान्यात पाणी शिरल्याने गणपती व्यवसायिकांचा देखील लाखोंचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्याने पेरलेले राब कुजून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या पाहणीनंतर आज पाहून तातडीने आम्ही हे पंचनामे सुरू करत आहेत. शेततळयाचे पाहणी करून कारवाई केली जाईल.

सागर वाडकर, तालुका कृषी अधिकारी, पेण
Exit mobile version