छोट्या वारकर्‍याची पंढरपूर वारी…

। मुरूड । वार्ताहर ।
आषाढी एकादशीला दहा दिवसांचा कालावधी असताना मुरुडसह दिघी कुडगाव येथिल सुमारे तीनशेहून अधिक वारकरी आळंदीच्या भोपळे दिंडी क्र. 14 मध्ये सामील झाले आहेत. या वारीत मुरुडच्या खारअंबोली गावांतील चिंतन दिपेश पेरवे हा छोटा वारकरीही सामिल झाला आहे. मागील अनेक पिढ्या वारीची परंपरा चालवित असून भोपळे दिंडीचे नियोजन झेंडेकरी देविदास महाराज लोखंडे, अध्यक्ष माऊली महाराज लोखंडे, मुरुडचे भाई मिठागरी, अनंत पाटील, दिपेश पेरवे हे करीत असल्याने घरचे वातावरण अध्यात्मिक असल्याने छोटा चिंतन हा आपल्या आई वडिलांसह विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीत सहभागी झाला आहे. अध्यात्माचा हा वसा एका पीढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरित होण्याचे हे एक बोलके उदाहरण.

Exit mobile version