। माणगांव । प्रतिनिधी ।
पुणे येथे मोशी याठिकाणी देशातील शेतकर्यांसाठी किसान कृषी प्रदर्शन शासनाच्यावतीने आयोजित केले जाते. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा 11 ते 15 डिसेंबर या कालावधीत कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे.
भात शेती लागवड यंत्राची पाहणी करीत असताना पंकज तांबे यांच्या सोबत स्वप्निल शिर्के, संभाजी गायकवाड उपस्थित होते. संपूर्ण देशातून कृषी प्रदर्शन मेळाव्याला भेट देण्यासाठी शेतकरी येत असतात. पंकज तांबे हे शेतकरी मित्र म्हणून तालुक्यात त्यांचा परिचय आहे. शेतकर्यांना नेहमी त्यांचा मदतीचा हात असतो. या कृषी प्रदर्शनात आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची यासाठी विविध अवजारे उपलब्ध होती. या अवजारांची संपूर्ण माहिती पंकज तांबे घेत होते जेणेकरून माणगांव विभागातील शेतकरी यांच्या करिता उपयोगी येऊ शकते हा त्यांचा महत्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे ते दरवर्षी कृषी प्रदर्शन मेळाव्याला भेट देत असतात.
कोकणातील शेतकरी यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून त्याच्या सोबत विविध प्रकारच्या भाजीपाला हा सुद्धा व्यवसाय शेतीला जोड धंदा म्हणून येथील शेतकरी करीत आहेत. या कृषी प्रदर्शनात आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची यासाठी नवीन यंत्र उपलब्ध असतात. देशातील शेतकरी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी पाच दिवसात येत असतात व नवीन तंत्रज्ञान, अवजारांची माहिती घेत असतात अशी माहिती पंकज तांबे यांनी दिली.