पंकजा मुंडे यांना केंद्राचा झटका

| मुंबई | वृत्तसंस्था |

पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रेतून राजकीय शक्तिप्रदर्शन केल्याच्या चर्चा रंगत असतानाच केंद्राकडून त्यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता केंद्रीय जीएसटी विभागाने जप्त केली आहे. मागील एप्रिल महिन्यात जीएसटी आयुक्तालयाने कारखान्यावर छापे टाकले होते. कारखान्याने बेकायदा 19 कोटी रुपयांचा जीएसटी बुडविल्याने जीएसटी आयुक्तालयाकडून चौकशी सुरु होती. दरम्यान केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची कोणती मालमत्ता जप्त केली आहे.

याची यादी कारखान्याच्या गेटवर लावली आहे. सन 2014 साली राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याच्या चर्चा होऊ लागल्या. त्यातच त्यांचा चिक्की घोटाळा देखील गाजला. त्यामुळे पंकजा मुंडे बॅकफुटवर गेल्या होत्या. दरम्यान सन 2019 साली पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर विधान परिषदेवर त्यांना घेतले जाईल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र विधान परिषदेवर देखील त्यांना संधी मिळाली नाही.

Exit mobile version