शेकापचे नेते जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
थोर संतश्रेष्ठ श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या जन्मदिनानिमित्त पंत पाडवा दिन धथोर संतश्रेष्ठ श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या जन्मदिनानिमित्त पंत पाडवा दिन धोकवडेमध्ये साजरा करण्यात आला. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यानिमित्त धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. तसेच सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा, शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला.
यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नृपाल पाटील, शेकाप प्रवक्त्या तथा सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, सखाराम पवार, धोकवडेचे माजी सरपंच सचिन म्हात्रे, दत्ता झेमसे, सासवणेचे माजी सरपंच संतोष गावंड, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, मधुरा मुलुष्टे, अशोक म्हात्रे, शेकाप शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष अनिल गोमा पाटील, दिगंबर राणे, जगदीश म्हात्रे, ॲड. विजय पेढवी, सुशील पाटील आदी मान्यवरांसह श्रीपंत भक्त मंडळाचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
अर्वाचीन काळातील थोर संतश्रेष्ठ श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांचा जन्म श्रावण महिन्यात झाला. त्यामुळे श्रावण महिन्यातील पहिला दिवस श्रीपंत पाडवा म्हणून साजरा केला जातो. अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथील श्रीपंत भक्त मंडळाच्या वतीने यावर्षी शुक्रवारी (दि.25) पंत पाडव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेकापचे नेते शंकरराव म्हात्रे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी गेल्या 43 वर्षांची परंपरा आजही जपली आहे. पंत पाडव्याचे औचित्य साधत विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
अभिजीतपंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते श्रीपंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी शेकापच्या नेत्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुण्यस्मरण करण्यात आले. तसेच उद्योजक निशिकांत लाड व सामाजिक कार्यकर्ते कमळाकर राणे यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. दहावी, बारावीच्या परीक्षेत एक ते तीन क्रमांक आणि 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या पंचक्रोशीतल 12 शाळांमधील विद्यार्थ्यांचा तसेच वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. श्रीपंत पाडव्याच्या निमित्ताने आठ दिवसांपूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत एक ते तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचादेखील बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.






