पनवेकरांनी पाहिली रामायण कथा

के.ई.एस विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

| पनवेल | प्रतिनिधी |

रामायणमध्ये घडलेल्या इतिहासाला विद्यार्थ्यांनी रामायण या नाट्यातून सादरीकरण केले. यावेळी पनवेलकरांना रामायण पाहण्याची संधी मिळाली. पनवेल येथील कोकण एज्यकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर इंग्लिश मीडियम विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.

शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या विभागातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यामध्ये पोवाडा, कीर्तन, जोगवा, नाटिका व नृत्य या कलाप्रकारांचा समावेश होता. प्रतिवर्षी कलाविष्कार सादर करण्याची परंपरा शाळेने यंदाही जपली. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी संस्कार सुमने ही संकल्पना साकारत शांती, संयम, विवेक व करुणा या गुणांचा अंगीकार करून त्यांच्यावर मात करावी व मनाला सुदृढ करून निकोप आयुष्य जगण्याचा संदेश दिला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष गायन व वादन करत नृत्य सादर केले. कार्यक्रमाची संहिता विद्यार्थ्यांनीच लिहिली होती. शाळेतील विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी यांच्यासह चेअरमन व्ही.सी. म्हात्रे, मुख्याध्यापिका मनीषा पाटील, मानसी कोकीळ आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामायण कथाने पनवेलकर भारवले
रामायणामध्ये घडलेल्या संपूर्ण इतिहास के.ई.एस इंदुबाई वाजेकर स्कूलमधील इयत्ता आठवी, नववी, दहावीतील 106 विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी एकत्रित येत रामायण कथा सादरीकरण केले. विशेष करून चेअरमन व्ही.सी. म्हात्रे, मुख्याध्यापिका मनीषा पाटील, मानसी कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली अवणी देशपांडे, विनोधीनी, सायली शिंदे, सुचिता म्हात्रे, पूनम, पल्लवी, प्रगती, आज्मा, प्राजक्ता, भक्ती, दीपा या शिक्षिका यांनी मेहनत घेऊन ही कथा तयार केली, त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. तसेच आरती वर्मा, संजीवनी या शिक्षकांनी डोंबारीनृत्य तयार केलेले विद्यार्थ्याने नृत्य सादर केले.
Exit mobile version