ॲड. रत्नदीप पाटील यांचा दणदणीत विजय
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल पनवेल बार असोसिएशनच्या प्रतिष्ठेच्या निवडणूक 2025 मध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. शहराच्या न्यायक्षेत्रातील प्रभावी मानल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये ॲड. रत्नदीप राम पाटील यांनी 536 मतांसह अध्यक्षपदावर विजय मिळवत पनवेलच्या कायदेविषयक वर्तुळात आपली ताकद दाखवली. दुसऱ्या बाजूला, भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे ॲड. मनोज कृष्णाजी भुजबळ यांना 508 मतांवर पराभव स्वीकारावा लागला, आणि हा धक्कादायक निकाल पनवेलमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
उपाध्यक्ष पदावर ॲड. सचिन अंबाजी म्हात्रे यांनी 602 मतांसह विजय मिळवला, तर त्यांच्या विरोधात असलेल्या ॲड. संतोष जोमा म्हात्रे यांना 426 मते मिळाली. सचिव पदाचा निर्णायक निकाल ॲड. प्रल्हाद घनश्याम खोपकर यांच्या बाजूने 722 मतांनी लागला, तर प्रतिस्पर्धी ॲड. नित्यानंद राम ठाकूर यांना 305 मतांवर समाधान मानावे लागले.
महिला राखीव (सहसचिव) पदासाठी ॲड. दिपाली रामदास गावंड यांनी 603 मतांसह विजय मिळवत आघाडी घेतली, तर ॲड. हेमा सिताराम भगत यांना 427 मते मिळाली. खजिनदार पदावर ॲड. धनराज कान्हा तोकडे यांनी 810 मतांचा विक्रमी आकडा गाठत विजय मिळवला, तर ॲड. महेबूब गैबी पटेल यांना 219 मते मिळाली. सहखजिनदार म्हणून ॲड. विशाल लक्ष्मण डोंगरे यांनी 671 मतांवर विजय मिळवला; त्यांच्या विरोधात ॲड. हेमंत शिंदे यांना 123 आणि ॲड. रोहिदास आगलावे यांना 227 मते मिळाली. ऑडिटर पदाची बाजी ॲड. भूषण मोरेश्वर म्हात्रे यांच्या नावावर पडली 724 मतांची सरस कामगिरी, तर ॲड. भास्कर रामचंद्र पाटील यांना 306 मते मिळाली. कार्यकारिणी सदस्य पदासाठी ॲड. विजयेंद्र नारायण मुंढे यांनी 574 मतांनी आणि ॲड. इर्शाद रमझान शेख यांनी 488 मतांनी विजय मिळवला. तर ॲड. आशिष विजय पनवेलकर (247), ॲड. जयसिंग शेरे (83) आणि ॲड. नागेश हिरवे (397) यांना पराभवाचा सामना करावा लागला. महिला राखीव कार्यकारिणी पदात ॲड. ज्योती पी. राऊत उरणकर यांनी 559 आणि ॲड. छाया रामदास म्हात्रे यांनी 429 मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विरोधात ॲड. समीना खान (113), ॲड. दिपाली बोहरा (325) आणि ॲड. आस्मिता भुवड (380) यांनी निवडणूक लढवली.







