। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहर वाहतूक शाखेतील पोलिसांना रस्त्यावर सापडलेला महागडा लॅपटॉप संबंधिताला परत करण्यात आला. पोलीस हवालदार युवराज येळे, अमिर मुलाणी व राजपूत यांना शिव कॉम्प्लेक्स चौकी ते एचडीएफसी सर्कल येथे वाहतूक नियमन करीत असताना अॅपल कंपनीचा लॅपटॉप रस्त्यावर सापडला. या तिघांनी याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन सोशल मीडियावर प्रसारित केली. त्यानुसार पनवेल तालुक्यातील पारगाव-दापोली येथील विनोद जितेकर यांनी संपर्क साधला. त्याबाबत खात्री झाल्यानंतर हा लॅपटॉप जितेकर यांच्या कुटुंबीयांकडे परत करण्यात आला आहे. याबद्दल पनवेल शहर वाहतूक शाखेचे कौतुक करण्यात येत आहे.







