। माथेरान । प्रतिनीधी ।
मागील आठवड्यात माथेरान मधील हॉटेल वरांडा ईन द फॉरेस्ट मधून बेपत्ता झालेले 58 वर्षीय पर्यटकाचा मृतदेह एको पॉईंट जवळील दरीत सापडला आहे. माथेरान मधील हॉटेल वरांडा ईन द फॉरेस्ट मध्ये सोमवार दि. 13 ऑक्टोबर ते शुक्रवार दि.17 ऑक्टोबर पर्यंत पर्यटक शानमुगा सुंदरम बालसुब्रमण्यम यांनी रूम घेतली होती. ते बुधवार दि.15 रोजी सकाळी फिरण्यासाठी हॉटेल बाहेर गेले होते. ते पुन्हा आपल्या हॉटेल रूम मध्ये परतले नाहीत. याबाबत हॉटेल व्यवस्थापनाकडून माथेरान पोलीस ठाण्यात पर्यटक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार येथील माथेरान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी तसेच पोलीस हवालदार गर्जे यांनी शोध मोहीम सुरू केली. यामध्ये त्यांना एको पॉईंट जवळ असलेल्या खोल दरीत बेपत्ता पर्यटकाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यटक शानमुगा सुंदरम बालसुब्रमण्यम हे एको पॉईंट जवळ खोल दरीच्या बाजूने फिरत असताना त्यांना ब्रेनस्ट्रोक या आजारामुळे चक्कर येऊन ते 1200 फूट दरीत कोसळले त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत होऊन ते मयत झाले.






