| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व लावास लुब्रिकन्ट्स पुरस्कृत इंटर अकॅडमी लेदर बॉल ज्युनियर वयोगटातील क्रिकेट स्पर्धा रसायनी पाताळगंगा येथील नेशनल इंस्टीट्यूट ऑफ सिक्योरिटीज मार्केट्सच्या मैदानावर उत्साहात संपन्न झाली, पीसीएसए फायटर्स, पीसीएसए सुपर किंगस आणि पीसीएसए मावेरीकस अश्या तीन संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता, प्रथम साखळी व नंतर बाद फेरीनुसार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पीसीएसए मावेरीकस संघांनी पीसीएसए फायटर्स संघावर मात करत अंतिम विजयी होण्याचा मान मिळवला आहे. स्पर्धेचं आयोजन अकॅडमितील युवा व होतकरू क्रिकेट खेळाडूंच्या कला गुणांना वाव मिळावा ह्या हेतूने आयोजित करण्यात आली, संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करणार्या देव सिंग याला मालिकावीर, उत्कृष्ठ फलंदाज व अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून गौरविण्यात आले तर उत्कृष्ठ गोलंदाज अर्जुन राव व उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक आयुष पाटील, प्रजज्वल पराडकर, फायटर खेळाडू तन्मय पोपेटा यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमासाठी लावास लुब्रिकन्ट्सचे मालक तथा पनवेल रोटरी क्लबचे अध्यक्ष रतन खारोल, पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सागर कांबळे, आरडीसीए सदस्य अँड.पंकज पंडित, अभिजित वाडकर, आदेश नाईक सह अकॅडमीचे पालक व खेळाडू उपस्थित होते.