पनवेल-महाड बसचा अपघात;18 जण जखमी


। अलिबाग । प्रतिनिधी ।
पनवेल आगारातून महाडकडे जाणार्‍या शिवशाही बसचा मंगळवारी (दि.25) सायंकाळी चार वाजता अपघात झाला. कर्नाळा अभयारण्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती एसटी आगारातून देण्यात आली. यामध्ये 18 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. अपघाताच्या ठिकाणी पोलीस पोहोचले असल्याचे सांगण्यात आले.

Exit mobile version