पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक

दुसऱ्या दिवशी 194 उमेदवारी अर्जांची विक्री

| पनवेल | प्रतिनिधी |

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पनवेल सार्वत्रिक निवडणूक बुधवार, 15 जानेवारी 2026 रोजी होत आहे, तर मतमोजणी व निकाल 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे. निवडणूक प्रक्रियेचा पहिला महत्त्वाचा टप्पा असलेल्या नामनिर्देशन प्रक्रियेला मंगळवार, 23 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र विक्रीच्या पहिल्या दिवशी एकुण 233 नामनिर्देशन पत्राची विक्री झाली होती. तर आज दिनांक 24 डिसेंबर नामनिर्देशन पत्र विक्रीच्या दुसऱ्या दिवशी एकुण 194 नामनिर्देशन पत्राची विक्री झाली आहे.

नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. दरम्यान आज बुधवार दिनांक 24 डिसेंबर दुसऱ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय 1, प्रभाग 1,2आणि 3 रोजी एकूण 55 नामनिर्देशन पत्र विक्री करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय 02 , प्रभाग 4,5,6 येथे एकूण 23 नामनिर्देशन पत्र विक्री करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय 03 , प्रभाग 7,8,9,10 येथे एकूण 37 नामनिर्देशन पत्र विक्री करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी कार्यालय 04 कामोठे , प्रभाग 11,12,13 येथे एकूण 45 नामनिर्देशन पत्र विक्री करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय 05, प्रभाग 14,15,16 येथे एकूण 18 नामनिर्देशन पत्र विक्री करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय 06, प्रभाग 17,18,19,20 येथे एकूण 16 नामनिर्देशन पत्र विक्री करण्यात आली. एकूणच आज सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून 194 नामनिर्देशन पत्र विक्री करण्यात आली. तर नामनिर्देशन पत्र प्राप्त संख्या शून्य आहे.

नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार, 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी छाननीनंतर तत्काळ प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक शुक्रवार, 2 जानेवारी असून, सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. तर, शनिवार, 3 जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, त्याचदिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.

Exit mobile version