पनवेल महापालिकेला पत्रकारांची ॲलर्जी

पत्रकारदिन साजरी न करणारी राज्यातील एकमेव महापालिका

| पनवेल | प्रतिनिधी |

दि. 6 जानेवारी या दिवशी संपूर्ण राज्यात पत्रकार दिन साजरा केला जातो. तसेच याच दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंतीदेखील साजरी केली जाते. यावर्षीही राज्यातील विविध ठिकाणी महापालिकेत पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. मात्र, पनवेल महापालिका पत्रकार दिन साजरी करण्यात आली नाही, असा आरोप पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, पनवेल महापालिका पत्रकार दिन साजरी न करणारी एकमेव महापालिका ठरली आहे. महापालिकेने पत्रकारदिनी पत्रकारांसाठी कार्यक्रम आयोजित केलेच नाही, मात्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादनदेखील करण्यात आले नाही. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी याबाबत विशेष लक्ष देऊन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा अपमान केल्याप्रकरणी आयुक्तासह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीदेखील श्री. महाडिक यांनी केली आहे.

Exit mobile version