| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
प्रशासन दैनिकात आलेल्या बातम्या सकारात्मक घेऊन त्या समस्या सोडविण्याचा नेहमीच प्रयत्न करते. पुढील वर्षी महापालिकेच्यावतीने पत्रकार दिन भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्याच्या दृष्टीने पत्रकारांनीच पुढाकार घेऊन नवनवीन कल्पना, सूचना काही महिने आधी द्याव्यात, असे आवाहन यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्ताने महापालिकेच्या मुख्यालयातील बैठक कक्षामध्ये मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस आयुक्तांच्या हस्ते पुष्पहारअर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त कैलास गावडे, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी, जनसंपर्क विभागप्रमुख प्रफुल्ल घरत तसेच पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आयुक्त गणेश देशमुख पुढे म्हणाले, येत्या काळात महापालिकेची भव्य इमारत होणार आहे. या इमारतीमध्ये पत्रकारांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असून, पत्रकारांसाठी विविध सुविधा देण्यात येणार आहेत. या कक्षाची नियमावली तयार करण्यासाठी देखील पत्रकार बंधूनी सहाय्य करावे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त कैलास गावडे यांनी केले. यावेळी पत्रकार बांधवांना पुष्पगुच्छ देऊन आयुक्तांनी सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.