फुटबॉल स्पर्धेत पनवेल संघाची बाजी

| उरण | वार्ताहर |

द्रोणागिरी स्पोर्ट्स अससोसिएशन उरणतर्फे 24 व्या राज्यस्तरीय फुटबॉल खुल्या गटांचे सामने रविवारी (दि.11) उरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात संपन्न झाले. या स्पर्धेत पनवेलच्या पीएफए संघाला विजेते पद, तर खोपोलीच्या वीरेश्वर संघाला उपविजेते पद मिळाले आहे. उत्तम गोलकिपर म्हणून पीएफए संघाच्या आर्यन म्हात्रेला सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात महदेव घरत, मिलिंद खारपाटील, शिवेंद्र म्हात्रे, चंद्रकांत गायकवाड, अमित भगत, प्रवीण घरत, किरण घरत, रमणीक म्हात्रे, सचिन पाटील, नयन पाटील, जयेश पाटील, संदीप घरत, किरण घरत, के.सी. घरत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजेत्यांना ट्रॉफी, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेतील सर्व सहभागी संघांमध्ये आकर्षणाचा बिंदू उरणचा सेवेन स्टार फुटबाल अकॅडेमी संघ ठरला. या संघाने आपल्या अद्वितीय कामगिरीने सर्व प्रेक्षकांचे व आयोजकांचे मन हेरावून घेतले. या संघात 14 व 15 वयोगटातील मुले होती. त्यांनी खोपोलीच्या गोरी एफ सी ह्या संघाला पहिल्याच फेरीत पराभूत करून उपांत्य पूर्व फेरीत पदार्पण केले. परंतु, अलिबागच्या मानवीर संघाला तगडी टक्कर देत पराभवाला सामोरे जावे लागले. सेवेन स्टार संघाला द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनने त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.

Exit mobile version