| पाली | वार्ताहर |
भारतीय जनता पार्टीतर्फे पालीमध्ये नुकतेच कॅरम डबल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील 32 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
भाजप महिला मोर्चा अध्यक्ष मुंबई व राज्य समन्वयक देशपातळी वर्षा भोसले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आशिष देशमाने व निखिल कोशिंबकर पनवेल सात हजार व चषक, द्वितीय क्रमांक सुरेश बिस्त व वैभव शिंदे पनवेल, पाच हजार व चषक, तृतीय क्रमांक आशुतोष खरात व सलीम खान कामोठे चार हजार व चषक व चतुर्थ क्रमांक शाम दहीवत व संतोष लावंगे पनवेल यांना तीन हजार व चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी राजेश मपारा, गिता पालरेचा, आलाप मेहता, आरिफ मणियार, रमेश साळुंखे, संजोग शेठ, देवस्थान अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांचे लाभले. या स्पर्धेसाठी सुशील शिंदे, पराग मेहता, उमेश साखरले, प्रमोद किळंजे, आशिष हजारे, वैभव जोशी, सुहास लोखंडे व सौरभ बेलोसे यांनी विशेष मेहनत घेतली.