पनवेलकरांनो, घनदाट जंगलाचे स्वप्न पूर्ण करा

| पनवेल | प्रतिनिधी |

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे निर्माण करण्यात येणार्‍या पनवेल शहरामधील नियोजित रोटरी घनदाट जंगल प्रकल्पाचे उदघाटन सर्वसामान्य पनवेलकरांच्या हस्ते केलेल्या वृक्षारोपणाने करण्यात येणार आहे.

तरी आपण स्वतः एका वृक्षाचे रोपण करण्यासाठी रविवार दि. 6 नोव्हेंबर सकाळी 9 ते 12 या वेळेत आपल्या सोयीनुसार नियोजित रोटरी घनदाट जंगल प्रकल्पाचे जागी आवश्य यावे. असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल ने केले आहे .

सदर रोटरी घनदाट जंगल प्रकल्प भूखंड (नियोजित), लक्ष्मी आय चॅरिटेबल हॉस्पिटल शेजारी, उरण रोड, पनवेल येथे असून विवार, दि. 6 नोव्हेंबर सकाळी 9 ते 12 पर्यंत आपण आपल्या नावाने किंवा आपल्या आप्त स्वकीयांच्या नावाने स्मृती प्रित्यर्थ मोठ्या वृक्षाचे रोपटे लावू शकता. या रोपट्याला आपल्या नावाची पाटी वृक्षारोपणाच्या वेळी लावली जाईल. सदरहू वृक्षारोपणासाठी रुपये 2000/- ( रु .दोन हजार) असे नाममात्र देणगी मूल्य एका रोपट्यासाठी आहे.

दि. 2 नोव्हेंबर पर्यंत देणगी मूल्य भरून आपले रोपटे व नाव आरक्षित करण्यासाठी आणि नावाची पाटी तयार करण्यासाठी मो.नं. 9820258515 किंवा 9322297522 वर एस .एम.एस किंवा व्हाटसअप अथवा फोन करून संपर्क करू शकता. आम्हाला खात्री आहे की, आपण या रोटरी घनदाट जंगल उपक्रमात आपल्या नावाच्या वृक्षाचे रोपटे लावून आवश्य सहभागी व्हाल आणि पनवेलकरांचे नियोजित घनदाट जंगलाचे असलेले स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावाल. असे आवाहन अध्यक्ष रो.लक्ष्मण पाटील, सचिव रो.अनिल ठकेकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांनी केले.

Exit mobile version