रेल्वेरूळ ओलांडून प्रवास
| पनवेल । वार्ताहर ।
रेल्वे स्थानकात अनेकवेळा रेल्वेरूळ आलोंडू नका, रेल्वेरूळ ओलांडणे धोकादायक आहे, असा स्पीकरवरून संदेश दिला जात असतो. याकरीता प्रवाशांना ठळक ठिकाणी सूचनादेखील दिल्या जात असून, नवी मुंबईमधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक असलेल्या या पनवेल रेल्वे स्थानकात या नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. एक नव्हे तर शेकडो प्रवासी सर्रास रेल्वेरूळ ओलांडून स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात. स्थानकात सर्वत्र सीसीटीव्हीचे जाळे पसरलेले असूनदेखील या प्रवाशांबाबत रेल्वे पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे.
अनेकांना कार्यालये गाठण्याची किंवा घरी जाण्याची घाई असते. अशावेळी अनेकजण पुलांचा सुरक्षित पर्याय सोडून चटकन रेल्वे स्थानक गाठण्यासठी रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात त्यातून अपघात घडताता. मात्र कितीही सूचना देऊनही पालथ्या घड्यावर पाणी अशी परिस्थिती कायम आहे, असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कडक धोरण राबविणे गरजेचे आहे.