| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
पनवेल पालिकेच्या निवडणुकीचे मतदान पार पडले असून साडेपाच वाजेपर्यत सुरु असलेल्या प्रक्रियेनंतर पनवेलकरांचे भविष्य मतपेटीत बंद करण्यात आले असून, उदया पनवेल करांचा भविष्य कोणाच्या हातात याचा निकाल लागणार आहे. काही तुरळक प्रकार किंवा किरकोळ वाद वगळता, प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे पनवेल पालिकेच्या मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. संवेदनशील मतदान केंद्रांवर तैनात केलेली अतिरिक्त सुरक्षा आणि पोलिसांची गस्त यामुळे ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. विशेष बाब म्हणजे, निवडणुकीआधीच भाजपचे 6 आणि अपक्ष 1 असे 7 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे, ज्यामुळे निकालाआधीच 7 जागेचे चित्र स्पष्ट झाले आहे.तर 20 प्रभागातील उरलेल्या इतर जगासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. निका लाचा दिवस हा पनवेलच्या राजकीय भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. दुपारपर्यंत बहुतांश प्रभागांचे कल स्पष्ट होतील आणि दुपारनंतर अधिकृत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.







