बेल्जियम पर्यटकांचे हुतात्म्यांना अभिवादन

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील मानिवली गावातील हुतात्मे हिराजी गोमाजी पाटील यांची जयंती निमित्त हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या सोहळ्यात बेल्जियन देशातील पर्यटक म्हणून आलेले पाहिजे मार्टिझ दांपत्य यांचे हस्ते हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

नेरळ येथील हुतात्मा स्मारक समिती यांच्या वतीने हुतात्मा चौक येथील स्मारक परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात हुतात्मा चौक येथील हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी पर्यटक म्हणून बेल्जियम देशातून माथेरान येथे जाण्यासाठी आलेले जोसेफ मार्टिझ आणि मार्टिना मार्टिझ यांना हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे आणि समितीचे कार्यकर्ते अरविंद कटारिया यांनी हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या कार्याबद्दल माहिती दिली आणि अभिवादन करण्यासाठी पाचारण केले.

हुतात्मा चौकातील दोन्ही पुतळे हे फ्रीडम फायटर यांचे असल्याची माहिती मिळताच त्या मार्टिझ दांपत्याने अभिवादन करण्यास तयारी दर्शविली.त्यानंतर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या 109 व्या जयतीनिमित हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केले.या दाम्पत्याने हुतात्म्यांच्या पुतळ्यांना अभिवादन केल्यानंतर स्मारक परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भित्ती चित्राची माहिती घेतली.त्यावेळी अरविंद कटारिया यांनी छञपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि ग्रेट मराठा लीडर असल्याची माहिती देताच बेल्जियम देशातील नागरिक जोसेफ मार्टिझ यांनी आय नो शिवाजी महाराजअसे सांगत त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकारे छायाचित्र आपल्या कॅमेर्‍यात लयबध्द घेवून शिवाजी महाराज यांना देखील अभिवादन केले. याप्रसंगी स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे , दर्वेश पालकर,गणेश पवार बंडू क्षीरसागर, अरविंद कटारिया, सलीम नजे, अशोक मिनमीने,बंडूमामा चव्हाण, किशोर कराळे,शाम मोहिते,विनायक भोईर,प्रमोद झोमटे आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत कडून अभिवादन…
हुतात्मा चौक येथे हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या अर्ध पुतळ्यांना नेरळ ग्रामपंचायत कडून अभिवादन करण्यात आले.हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंती निमित्त नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य उमा खडे, शिवाली पोतदार तसेच ग्रामपंचायत चे मंगेश इरमाळी,प्रमोद बाचम,जगदीश डबरे, चंद्रकांत राठोड आदी उपस्थित होते.

Exit mobile version