आरसीएफ प्रशासन व शिक्षण विभागाची बैठक
। अलिबाग । प्रतिनिधी ।
सुरु असलेली आरसीएफची शाळा बंद होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पालकांनी आक्रमक भुमिका घेत शिक्षण विभागासह आरसीएफ प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. शाळेचा दर्जा चांगला असताना शाळा बंद करण्याची का भुमिका घेतली जात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला.
डेक्कन एज्यूकेशन सोसायटीमार्फत आरसीएफची शाळा चालविली जात होती. परंतु शाळा चालविण्यास समर्थ नसल्याचे शिक्षण संस्थेने कळविले. त्यामुळे शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती पालकांमध्ये निर्माण झाले होते. अखेर पालकांनी आक्रमक भुमिका घेत शिक्षण विभागाच्या ही बाब लक्षात आणून दिली. शाळा चालु ठेवा अशी मागणी केली. त्यानंतर शाळेच्या मध्यस्थीने शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु शासनाने आरसीएफ शाळा सुरु ठेवण्यासाठी पर्यायी शिक्षण संस्था आहे, का सवाल उपस्थित करीत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अहवाल मागविला. त्यानुसार शिक्षण विभागाने वरिष्ठांच्या सुचनेनुसार अहवाल पाठविला. ही बाब पालकांच्या लक्षात आली. डेक्कन शिक्षण संस्थेमार्फत चालविली जाणारी आरसीएफची शाळा बंद होण्याच्या हालचाली सुरु झाल्याने गुरुवारी सकाळी पालकांनी आरसीएफ शाळेत जमाव केला. आरसीएफ कंपनीचे अधिकारी व शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन हा अहवाल पाठविला कसा असा सवाल उपस्थित केला. पालकांनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमारा पुढे शिक्षण अधिकार्यांची पंचाईत झाली. दहावी, बारावीमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची जाणीव पालकांनी करून दिली. अखेर शिक्षण अधिकर्यांना धारेवर धरत घेतलेला निर्णय मागे घ्या असे पालकांनी सांगितले. पालकांच्या आक्रमक भुमिकेपुढे शिक्षण अधिकार्यांना अखेर मागार घेण्याची वेळ आली.