| रेवदंडा । वार्ताहर ।
शाळा सुंदर असावी, या उद्देशाने राजिप शाळा चोरढेच्या विदयार्थ्याच्या पालकवर्गानी शाळेचे बाहय रंग सुधारण्यासाठी एक दिवस शाळेसाठी स्त्युत्य उपक्रम राबवित श्रमदान केले. चोरढे राजिप मराठी शाळेत दि. 9 मार्च रोजी शाळेसाठी पालकांनी एकदिवसाचे श्रमदान केले, यावेळी एकूण 46 पालकवर्ग उपस्थित होते. यामध्ये मोरेश्वर दुकले, सुनिल घाग, गंगाराम भोईर, कमलाकर घाग, प्रमिला घाग, सुरेश तांबडे, दिनेश घाग, प्रमोद चोरढेकर, परेश घाग, माधूरी शेडगे, द्रौपदी भोईर, स्वप्नाली घाग, लीना तांबडे, वैशाली घाग, अमिषा कोटकर, दिपाली शेडगे, महानंद पाटील, अश्विनी घाग, संतोष भोईर, उषा चोरढेकर, अलका चोरढेकर, निकिता डोलकर, भारती घाग, पाडुंरंग काजारे, मालती शेडगे, मनिषा चोरढेकर, उज्वला घाग, रजनी भोईर, निर्मला महाडिक, कांता घाग, सुषमा महाडिक, पायल महाडिक, शेवंती महाडिक, जयमाला महाडिक, नितेश घाग, हिरा भोईर, उषा सुभेदार, दिपाली अमलीकर, राखी भिकारी, मंथना काजारे, परशुराम चोरढेकर, आदी चोरढे,सावरोली व वेताळवाडी गावातील विदयार्थ्याचे पालकवर्ग उपस्थित होते.
यावेळी पालकांनी शाळेचे बाहय रंगरूप सुधारण्यासाठी रेंजगा टेम्पो मध्ये भरून आणणे, लादी बसवणे, रेतीची वाहतुक करणे, जमिन लेव्हंल करणे, इत्यार्दी कामात श्रमदान केले. तत्पुर्वी सुरेश तांबडे, सुनिल घाग श्रीफळ वाढवून कामाचा श्रीगणेशा केला. या कामासाठी गंगाराम भोईर, दिनेश घाग, रवी यांनी शाळेसाठी अनेक वस्तू उपलब्ध करुन दिल्या. शाळेच्या पालकांच्या श्रमदानाचे स्तुत्य उपक्रमास मुरूड पंचायत समिती विस्तार अधिकारी सुनिल गवळी तसेच देवानंद गोगर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुरेश तांबडे, संगिता भगत, विजय जाधव, देवानंद गोगर व राजेंद्र नाईक प्रतिभा वर्तक यांनी सुयोग्य नियोजन केले होते.