पोलीस निरीक्षक सोनवणे याचे प्रतिपादन
| म्हसळा । वार्ताहर ।
पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा पोलीस ठाण्यात सायबर गुन्हे आणि माहितीचा अधिकार या बाबत वातावरण निर्मिती व्हावी यासाठी कायदे तज्ज्ञ आणि अभ्यासू नागरिक यांची सभा घेण्यात आली. यावेळी नागरिकांना संबोधित करताना अॅड. मुकेश पाटील यांनी 15 जून 2005 रोजी तयार करण्यात आलेल्या माहितीचा अधिकार याबाबत सविस्तर माहिती सांगितली. यामध्ये प्रामुख्याने जनतेचे हक्क आणि अधिकार, सरकारी कार्यालये व त्यांच्या जबाबदार्या, अल्ट्रासिटी, खून, दरोडे, अतिप्रसंग, लबाडी, फसवणूक जमिनीचे व्यवहार अश्याप्रकाराच्या अनेक छोट्या मोठ्या गुन्ह्यांच्या कायदा बाबत यांनी मार्गदर्शन केले.
पोलीस निरीक्षक सोनवणे यांनीही पोलीस, जनता, गुन्हे आणि कायदा याबाबत माहिती देताना दिवसेंदिवस वाढत असलेले सायबर गुन्हे याबाबत माहिती देताना त्याचे गांभीर्य लक्षात घेण्याबाबत आवाहन केले. तरुण पिढी या सायबर गुन्ह्याच्या विळख्यात जास्त प्रमाणात ओढली जात असून पालकांनी आपल्या पाल्याकडे जबाबदारी पूर्वक लक्ष देणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. मोबाईल जेवढा फायदेशीर आहे त्यापेक्षा अधिक पटीने तो धोकादायक असल्याचे सांगून मोबाईलच्या माध्यमातून इ -मेल, व्हाट्सअप, चॅटिंगद्वारे अधिकाधिक गुन्हे घडत असल्याचे सांगून पालकांनी याबाबत अधिक दक्षता घेण्याचे आवाहन सोनवणे यांनी केले.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.