| चौल | प्रतिनिधी |
चौल भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरातून दत्तमहाराजांच्या पादुकांची पायी पालखी परिक्रमा सोहळ्यास उद्या गुरुवार, दि. 2 रोजी सकाळी सात वाजता शुभारंभ होणार आहे. श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबागचे अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे चौथे वर्ष.
दरम्यान, पर्वतनिवासी दत्तात्रेयांचे स्वयंभू स्थान असलेल्या संपूर्ण भोवाळे डोंगराला पालखी प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. ही पालखी चौल भोवाळेमार्गे मुख्य रस्त्यावरुन चौलनाका, चौल भाटगल्ली, सागमळा, चौलमळा येथून पुढे देवघर, सराई, हनुमानपाडा अशी मार्गक्रमणा करीत भवाळे येथून दत्तमंदिरात मार्गस्थ होणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबाग विश्वस्त संस्थापक अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सागर कुंड, चौल ग्रामस्थ व दत्तभक्त मेहनत घेत आहेत. या सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. मोरे यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी 9372210932 या क्रमांकावर संपर्क साधवा, असे कळविण्यात आले आहे.