। खारेपाट । वार्ताहर ।
उद्योजक अमित नाईक पुरस्कृत खारेपाट प्रिमियर लिग शुटींग बॉल स्पर्धेत परिविहान वॉरीयर्स संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. संघ मालक रुमप म्हात्रे व कर्णधार अनिकेत पाटील तर उपविजेता सुफला स्ट्राकर्स संघ मालक मधुकर कपाले, कर्णधर राजेश पाटील व तृतीय क्रमांक देवेंद्र स्पोर्टस् मांडवखार संघ मालक कॅप्टन अनिकेत म्हात्रे, तसेच चतुर्थ लिबर्टी संघ नारंगी संघ मालक जितेंद्र म्हात्रे, कर्णधार स्वप्नील शिंदे विजेता ठरले.
या स्पर्धेत बेस्ट शुटर राजेश पाटील सुफला स्ट्राकर्स व बेस्ट नेटमन कपिल ठाकूर देवेंद्र स्पोर्ट तसेच बेस्ट डिफेंन्स अनिकेत पाटील माणकुले व स्पर्धेत प्लेअर ऑफ द प्लेसमेंट सामनाविर रोहीत पाटील वाघ्रण यांना गौरविण्यात आले. सदर स्पर्धेत खारेपाटातील 8 नामांकित संघ सहभागी झाले होते. स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात येऊन प्रत्येक संघाला तीन संधी देण्यात आल्या. त्याप्रमाणे बहिरीदेव संघ बहिरीचापाडा संघ मालक सिध्दू म्हात्रे कर्णधार रत्नेश मोकल, तसेच आद्य सप्लायर्स म्हात्रोली संघमालक अमित नाईक, कर्णधार परेश मोकल तसेच शंभुराजे सेव्हनस्टार बहिरीचापाडा संघमालक विक्रम पाटील व कर्णधार सुयोग पाटील सदर संघांनीही खेळी चांगल्याप्रकारे केली.
सदर स्पर्धा महात्मा गांधी विद्यालय हाशिवरे येथे माजी आ.स्व. मधुकर ठाकूर क्रिडा नगरीत संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन आ.अनिकेत तटकरे यांनी केले. तसचे स्पर्धेचे आयोजक उद्योजक अमित नाईक यांच्या हस्ते पारितोषीक वितरण झाले. यावेळी खारेपाट शुटींगबॉल पदाधिकारी शंकर मोकल, उपाध्यक्ष सुनिल म्हात्रे, रायगड जिल्हा शुटींगबॉल खेळाडू संघटना व खारेपाट प्रिमियर लिग कमेटी खारेपाटातील सरपंच, उपसरपंच, सदस्या, आजी माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य व डॉक्टर, पत्रकार, विविध स्थरातील मंडळी, आजी-माजी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे सन्मान अमित नाईक व आयोजकांतर्फे करण्यात आले. खारेपाट प्रिमियर लिग भव्य स्पर्धा पहिल्यांदाच अमित नाईक उद्योजक यांनी भरवून क्रिडा क्षेत्रात मोठे कार्य केल्याबद्दल सर्व खेळाडूंतर्फे अमित नाईक यांचे अभिनंदन करण्यात आले. सदर स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिडा प्रेक्षक हजर होते.