परळी-घोटावडे पुलाची होणार दुरुस्ती

ऑल इंडिया पँथर सेनेच्या आंदोलनाला यश
सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे लेखी आश्‍वासन

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील परळी घोटावडे धोकादायक व मोडकळीस आलेल्या पुलाची दुरुस्ती व मजबुतीकरण व्हावे, या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने मंगळवारी पुलावर आमरण उपोषण करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता राजीप उपविभाग पेणचे श्री. नाईक व पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार, गटविकास अधिकारी विजय यादव यांच्या उपस्थितीत उपोषणकर्ते सुधागड तालुकाध्यक्ष संदेश भालेराव, तालुका सचिव आवेश भालेराव यांना लेखी पत्र दिले. त्यानंतर आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.

हा धोकादायक पुल पूर्णपणे वाकला असून, केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना होण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. या पुलावरुन बारमाही वाहतूक सुरु असते. अशातच मागील अनेक वर्षांपासून या पुलाची डागडुजी, देखभाल व दुरुस्ती न झाल्याने आजघडीला या पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. नादुरस्त व कमकुवत झालेल्या या पुलावरुन प्रवास करताना जिव मुठीत घेान प्रवास करण्याची वेळ येथील ग्रामस्त व नागरिंकांवर आली आहे. या पुलाची दुरुस्ती व मजबुतीकरण करावे यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेने आक्रमक होत केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, उपाध्यक्ष सेवक जाधव, तालुकाध्यक्ष संदेश भालेराव आदींसह कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version