स्वच्छता अभियानात लोकप्रतिनिधींचा सहभाग

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत नगरपरिषद हद्दीत सहावे मासिक स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहरात शहरातील आमराई परिसरातील रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. त्यात पालिकेचे अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी हातात झाडू घेवून स्वच्छ्ता अभियान सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतून मे 2023 मध्ये जिल्ह्यातील शहरी भागात महिन्यातील एक दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात सुरुवात झाली. कर्जत शहरात चार फाटा ते बिकानेर चौक भिसे गाव या भागात तीन मासिक स्वच्छ्ता मोहीम राबवून त्या ठिकाणी रस्त्याची स्वच्छता, वृक्षारोपण, अतिक्रमण दूर करणे आदी कामे करण्यात आली होती. पालिकेने आवाहन केल्याने शहरातील अनेक स्वच्छ्ता प्रेमी नागरिक स्वच्छ्ता मोहिमेत सहभाग घेत परिसर स्वच्छ करण्यात महत्त्वची भूमिका बजावत होते.

या अभियानात नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, अशोक ओसवाल शरद लाड, सुदाम म्हसे, संदीप कांबळे, रवींद्र लाड, मनीष गायकवाड, स्वागत विरंबोले, निलेश देशमुख, सुनील लाड, दीपक खेबडे, ऋषिता शिंदे ,कल्याण लोखंडे, बापू भैरव, आदी सहभागी झाले होते.

Exit mobile version