असंख्य कार्यकर्ते शेकापमध्ये

चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा


। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन वावे पोटगे, वावे खार मुंबई महिला मंडळ यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.3) मुंबई येथील गझधर बांध सांताक्रुझ येथे पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी मुंबईतील युवा नेत्या साम्या राजेंद्र कोरडे, अलिबाग तालुक्यातील रामराजचे माजी सरपंच मोहन धुमाळ, झावरे, प्रकाश पनवेलकर, भालचंद्र पाटील, विश्‍वास मालुसरे, विनायक तांबडकर, विकास पाटील, गणेश तांबडकर, गितेश भायतांडेल, अक्षय ढिकले, नितिन जानकर, महिला मंडळ अध्यक्षा संजना घाणेकर, अश्‍विनी म्हात्रे, अर्चना काटकर, घाणेकर बंधु , वावे पोटगे, वावे खार गावातील मुंबईकर मंडळी व शेकाप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकापचे नेते जयंत पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून वावे पोटगे, वावे खार वावे पोटगे, वावे खार मुंबई महिला मंडळातील असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. तळागाळातील घटकांचा विचार करणारा, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारा तसेच गरीबांना केंद्र बिंदू मानून काम करणारा शेतकरी कामगार पक्ष आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षच आपले प्रश्‍न सोडवू शकतो असा विश्‍वास निर्माण करीत असंख्य कार्यकर्ते, महिला शेकापमध्ये सामील झाले.

Exit mobile version