। महाड । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि.18) चांढवे बु. येथील माजी सरपंच डॉ. इरफान अंतूले यांनी महाड विधानसभा मतदार संघातील मविआ उमेदवार स्नेहल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटातून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात पक्ष प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशावेळी बोलताना स्नेहल जगताप म्हणाल्या की, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेला पक्ष प्रवेश आमदारांना घाम फोडणारा असून माझा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, उप तालुका प्रमुख चैतन्य म्हामुणकर, इम्रानभाई अंतूले, विभाग प्रमुख इम्रान कौचाली, विभाग संघटक अविनाश चौधरी, जेष्ठ शिवसैनिक आश्रफभाई कापडी, युवासेना प्रमुख प्रफुल धोंडगे, महेंद्रशेठ धोंडगे, सरपंच अशोक करंबळेकर आणि सर्व मान्यवर शिवसैनिक उपस्थित होते.