। महाड । प्रतिनिधी ।
महाड विधानसभा मतदार संघात होणारे पक्ष प्रवेश हे ऊर्जा देणारे व भविष्यातील परिवर्तनाची नांदी असल्याचे मत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी काथे आदिवासीवाडी येथील पक्ष प्रवेश दरम्यान व्यक्त केले.
यावेळी बोलताना स्नेहल जगताप म्हणाल्या की, गेली 15 वर्षे येथील वाड्या आ. गोगावले यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामूळे अनेक गावं आज शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश करत आहेत. यामुळे वेगळीच ऊर्जा मिळत आहे. तुमची आमची मशाल विधानसभेत पाठवायची आहे. तसेच, भविष्यात सर्वांनी एकत्र येत विकास साधायचा असल्याचा विश्वास स्नेहल जगताप यांनी व्यक्त केला आहे.
महाडमधील काथेची आदिवासी वाडीत 400 मतदानर आहेत. मात्र, आज निवडणूका तोंडावर आल्याने आमदार गोगावले यांना आमची गरज भासली आहे. यावेळी स्नेहल जगताप यांना जास्तीत जास्त मतदान करूप विधानसभेत पाठवून आमदारांना त्यांची जागा दाखवून देऊ. असा निर्धार रमेश हिलम यांच्यासह आदिवासी बंधू व भगिनी यांनी पक्ष प्रवेश करताना केला आहे. यावेळी माजी उपसभापती तुकाराम सुतार, उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार, अनिल मोरे, संदीप जाधव, शिवानी म्हामुणकर, विद्या नलावडे, सुनील आदींसह गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.