| पेण | प्रतिनिधी |
पेण गुरव आळी येथील पार्वती रामचंद्र गुरव यांचे वयाच्या 94 वर्षी आपल्या राहत्या घरी निधन झाले आहे. गुरव या गोटेश्वर मंदिर व मारुती मंदिराच्या पुजारी होत्या. या दोन्ही मंदिराची पुजेची सनद गुरव कुटुंबीयांना ब्रिटीश सरकारकडुन मिळाली होती. गेली 70 वर्षे पार्वती आजी या शिवभक्त होत्या. त्या न चुकता रोज गोटेश्वर मंदिरामध्ये शिवआराधाना करत असत. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुल, सुना, नाटवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर पेण येथील विश्वेश्वर स्मशान भुमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.