माथेरानमध्ये प्रवासी रिक्षाची घुसखोरी; पोलिसांकडून कारवाई

| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये रिक्षा प्रायोगिक तत्वावर चालविली जात आहे. शासनाच्या वतीने केवळ पर्यावरण पूरक सात ई रिक्षांना परवानगी देण्यात आली आहे.मात्र अन्य वाहनांना बंदी असताना देखील मिरा रोड मुंबई येथील प्रवासी रिक्षा रविवारी मुक्त संचार करीत असल्याचे आढळून आले. दरम्यान, सदर रिक्षा ग्रामस्थांनी अडविली असून पोलिस ठाण्यात थांबविण्यात आली असून सदर रिक्षा हजर केली जाणार आहे.

बाहेरील रिक्षा पण माथेरानमध्ये येऊ शकतात असे वाटल्याने मिरा रोड मुंबई येथील एक प्रवासी रिक्षा रात्री साडे अकरा वाजता शहरात पोहचली.त्यावेळी स्थानिकांनी (एम एच 02 डीयु 2889) ही गाडी चालक प्रमोद कुमार होरीलाल यादव हा प्रवासी यांना घेऊन आला.त्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आणि सदर पोलीस ठाण्यात नेली.अश्‍वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम यांनी पोलिसात त्या रिक्षाबद्दल तक्रार दिली. रिक्षा चालविण्यास बंदी असताना प्रवासी वाहन आणण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्यात त्या रिक्षा चालक वर गुन्हा दाखल केला आहे.तर ती रिक्षा देखील ताब्यात ठेवण्यात आली आहे.

माथेरान पोलीस ठाण्यात या खासगी प्रवासी रिक्षा बद्दल गुन्हा दाखल केला त्या रिक्षा एम एच 02 डी यु 2889वर आणि चालक यादव यांच्यावर माथेरान मध्ये वाहनांना बंदी असताना वाहन नेल्याबद्दल माथेरान अधिनियम 1959 चे कलम 43 तसेच मोटार वाहन 66 कायदा 2000 आणि मुंबई पोलीस अधिनियम 17/199 अन्वये गुन्हा दाखल केला गेला आहे.याबाबत त्या रिक्षास न्यायालयात हजर केले जाणार असून देखील काही वाहने स्थानिक नियमांची माहिती नसल्याने शहरात प्रवेश केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती माथेरान पोलीस ठाणे यांच्याकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version