लोकलमध्ये विसरलेली प्रवाशांची बॅग पोलिसांच्या स्वाधीन

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत येथून उपनगरीय लोकलने वांगणी येथे जात असलेल्या हालिवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्रमिला बोराडे यांना एक बॅग आढळून आली. त्यांनी ती बॅग वांगणी स्थनाकात उतरून तेथील स्थानक प्रबंधक यांच्या कार्यालयात जमा केली. त्या बॅगमध्ये काही कागदपत्र आणि साहित्य होते.

कर्जत तालुक्यातील हालिवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्रमिला सुरेश बोराडे हालिवली या कर्जत रेल्वे स्टेशन येथून उपनगरीय लोकलने वांगणीकडे जात होत्या. त्यावेळी त्यांना उपनगरीय लोकलमधील प्रवासादरम्यान एक बॅग आढळून आली. त्यांनी लोकलमधील प्रवाशांना त्या बॅगबद्दल विचारले असता कोणत्याही प्रवाशाने ती बॅग आपली नाही असे सूचित केले. त्यानंतर बोराडे यांनी वांगणी स्थानकात उतरताना ती बॅग आपल्या सोबत घेतली आणि स्थानकातील स्टेशन प्रबंधक यांच्या कार्यालयात जमा केली. त्यावेळी रेल सुरक्षा दलाचे महिला जवान तेथे पोहचल्यावर ती बॅग त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. महिला सुरक्षा कर्मी यांनी ती बॅग उघडून पाहिली असता त्या बॅगमध्ये काही फॉरेन करन्सी तसेच काही पैसे,आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच इतर महत्त्वाचे ओरिजनल कार्ड, रेनकोट होते. त्यावेळी संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून संपर्क करण्यात आल्यावर ती बॅग स्थानक प्रबंधक कार्यालयात सुपूर्द केली.

दरम्यान संबंधित बॅग मालकांनी वांगणी स्थानकात येऊन आपली ओळख पटवून आणि कागदपत्र दाखवून बॅग ताब्यात घेतली. तसेच, त्या प्रवाशाने माजी सरपंच प्रमिला बोराडे यांनी संपर्क करून आभारदेखील मानले.

Exit mobile version