मुरूड डेपोतील भंगार गाड्यांमुळे प्रवासी त्रस्त

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील नंबर 1 चा असणारा मुरूड एसटी डेपो सध्या भंगार गाड्यांनी भरला आहे. यामुळे रोजच्या रोज प्रवास करणारे प्रवासी या गाड्यांमुळे त्रस्त झाले असून नाराजी दर्शवली आहे.

सतत भंगार गाड्यांमुळे प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्याने काही प्रवाशांनी सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांच्याकडे तक्रार केली. सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर आक्रमक होऊन पेण डिव्हीजन रामवाडी येथील विभागीय नियंत्रक दिपक घोडे यांना मुरूड डेपोतील एसटी गाड्यामध्ये सुधारणा करावी नाही तर निवेदन न देता डेपोमध्ये येऊन एसटी बंद करून आंदोलन करु, असा इशारा यावेळी अरविंद गायकर यांनी दिला आहे.

मंगळवारी (दि. 4) सकाळी 4.45 वाजता सुटणारी मुरुड-मुंबई गाडी डेपोतून अर्धा तास आधीच उशीरा सोडून त्यात अत्यंत भंगार अवस्थेत असलेली गाडी मुंबईला सोडण्यात आली. ही एसटी ऐवढी भंगार होती की, या गाडीच्या पुढच्या काचा फुटलेल्या तसेच बसायची सीट मोडकळीस आणि आतून भयानक अस्वस्थेत असलेली गाडी देण्यात आली. प्रवाशांनी बसायचं कस हा प्रश्‍न विचारला असता तर वाहक निट उत्तर देत नसल्याने नाईलाजाने या भंगार अवस्थेत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एसटी आगार व्यवस्थापक गांभीर्याने लक्ष देताना दिसत नसल्यामुळे मुरुड डेपोची अवस्था भंगारापेक्षा गडद झाली आहे. आता तरी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून भंगार डेपोला नवीन डेपो करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी केली आहे.

Exit mobile version