सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांची मागणी
| आगरदांडा | वार्ताहर |
गणेशोत्सव आणि कोकणाचं अनोखं नातं आहे. वर्षातुन एकदा येणाऱ्या गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने कोकणी लोकांना आधीपासूनच बाप्पाचे वेध लागलेले असते. या उत्सवाकरिता हजारो चाकरमानी मुंबई, ठाणे, कल्याण आदिंसह शहरातुन एसटी बसेसने आपल्या गावी येत असतात. परंतु यांचा प्रवास खडतर होऊ नये यासाठी मुरुड आगारातुन गणपती उत्सवाकरिता प्रवासाच्या प्रवासासाठी एसटी बसेस चांगल्या असाव्यात अशी मागणी मुरुड-शेगवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी केली.
मुरुड आगारातुन सुटणाऱ्या गाड्याची अवस्था खुप गंभीर आहे. गाड्याची अस्वच्छता, चालु गाड्या रस्त्याचं बंद पडणं हे सारखंच चालू असल्याने प्रवाशांची नाराजी प्रत्येक वेळी करत असतात. पण त्याकडे गांभीर्याने आगारव्यवस्थापक बघताना दिसत नाही. सध्या मुरुड आगारात 36 गाड्या उपलब्ध आहेत ते पण गाड्यांनी मान टाकलेल्या आहेत. तरी ही नवीन गाड्याची मागणी नाही. गेलेल्या 10 हिरकणी बसेस पुन्हा आणण्याचा विचार ही करताना दिसत नाही. एसटी आणि चाकरमान्यांचे अतुट नाते परंतु हे नातं जुन्या गाड्या पुरतात राहिला आहे. आमच्या प्रवाशांनी काय जुन्या भंगार गाड्यात प्रवास करायचं का? आणि नविन गाड्यांसाठी आंदोलन करत बसायचं का? प्रशासनाला कधी जाग येणार. ज्या एसटी बसेस आहेत त्या गाड्याची गणपती उत्सवापुर्वी चांगल्याप्रकारे मेंटेन करुन व त्या वेळेत गाड्या सोडुन चाकरमानाचा परतीचा प्रवास सुखाचा करावा अशी मागणी समाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी केली आहे.