रोहा-स्वारगेट एसटी बंद; प्रवाशांचे हाल

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| सुतारवाडी | प्रतिनिधी |

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे सर्वत्र अतिवृष्टी झाली होती. यावेळी ताम्हणी घाटातील एका मंदिरासमोर असलेली मोरी खचली आहे. तसेच, येथील डोंगराची माती खाली आल्याचे बोलले जात असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही वाहनाला ये-जा करण्यासाठी मार्ग नसल्यामुळे हा मार्ग वाहनांसाठी बंद आहे. त्याचा फटका रोहा-स्वारगेट असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे.

रोहा-स्वारगेट ही एसटी दररोज सकाळी 6.00 वाजता रोहा येथून सुटते. त्यानंतर ती कोलाड-सुतारवाडी करत विळा-ताम्हीणी घाटामार्गे स्वारगेटकडे जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही गाडी या मार्गावरून जात आहे. ही गाडी सुरू झाली तेव्हापासून प्रवाशांनी फुल्ल असते. सुतारवाडीमार्गे पुण्याकडे जाणारी ही एकमेव एसटी असल्यामुळे येथील ग्रामीण भागातील प्रवाशांना त्याचा फायदा होतो. परंतु, जुलै महिन्यात पावसाने अतिवृष्टी केल्यामुळे पुण्याकडे जाण्याचा मार्ग बंद झाल्यापासून आजपर्यंत रोहा-स्वारगेट एसटी सेवा पूर्ववत करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत असून, आर्थिक भुर्दंड सहन करत त्यांना पाली-खोपोली मार्गे पुण्याकडे जावे लागत आहे.

Exit mobile version