पाताळगंगाने गाठली धोक्याची पातळी

| रसायनी | वार्ताहर |

शनिवारपासून सतत पडणार्‍या पावसामुळे पाताळगंगा नदीने रविवारी सकाळी धोक्याची पातळी गाठली असून, पुढेही पावसाची मुसळधार सुरूच राहिली तर पाताळगंगा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पावसाची सतत मुसळधार सुरु असून रसायनीसह तालुक्याला चांगलेच झोडपले आहे. ठिकठीकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. रविवारी मोहोपाडा आठवडी बाजार असल्याने भरगच्च भरणारा बाजार दुपारपर्यंत सामसूम दिसत होता. दांड रसायनी रस्त्यावर काही सखल भागात पाणी साचल्याने ये-जा करणार्‍या प्रवाशांना व पादचार्‍यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रविवारी सकाळपासूनच पावसाची मुसळधार सुरुच असल्याने रसायनीकरांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर जाण्याचे टाळले.

Exit mobile version