| माणगाव | प्रतिनिधी |
माणगावचे रहिवासी तथा रोटरी क्लब ऑफ माणगाव माजी अध्यक्ष गणेश काळे यांचे पिताश्री अशोक गोविंद काळे यांचे रविवार, दि. 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.35 वा. त्यांच्या राहत्या घरी माणगाव येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, जावई, पाच नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने काळे कुटुंबियांबरोबरच मित्रपरिवार यांच्यावर शोककळा पसरली आहे.
अशोक काळे यांच्या निधनाची माहिती माणगाव शहरासह तालुक्यात सर्वत्र समजताच अनेकांनी त्यांच्या माणगाव येथील राहत्या घरी धाव घेऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर माणगाव येथील स्मशानभूमीत सायंकाळी 7 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठा जनसमुदाय अंत्यविधीला उपस्थित होता. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार, दि.25 नोव्हेंबर रोजी, तर उत्तरकार्य विधी तेरावे शुक्रवार, दि.28 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी पोलीस ठाणे जवळ माणगाव येथे होणार असल्याचे त्यांचे सुपुत्र गणेश काळे यांनी सांगितले.







