तळा तालुका वगळता सर्व तालुक्यात रुग्ण

1 हजार 096 नवे रुग्ण; एकाचा मृत्यू
101 कोरोनामुक्त, जिल्ह्यात 3 हजार 557 सक्रीय रुग्ण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गुरुवार दि. 6 जानेवारी रोजी कोरोनाच्या 1 हजार 096 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 101 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 557 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. तळा तालुका वगळता सर्व तालुक्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
गुरूवारी पनवेल महापालिका हद्दीत 787, पनवेल ग्रामीण 133, उरण 12, खालापूर 18, कर्जत 25, पेण 29, अलिबाग 31, मुरुड 2, माणगाव 16, रोहा 13, सुधागड 1, श्रीवर्धन 3, म्हसळा 1, महाड 23, पोलादपूर 2,
असे 1 हजार 096 रुग्ण आढळले.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 76 हजार 456 झाली आहे. यापैकी 1 लाख 68 हजार 308 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 591 वर गेला आहे. सद्यस्थितीत 3 हजार 557 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version