मराठी शाळेला ग्रामपंचायतीमार्फत सहकार्य करणार – पाटील

। गडब । वार्ताहर ।
गडब येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची घटती विद्यार्थी संख्या ही चिंतेची बाब आहे. जनजागृती करुन येथील विद्यार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असून, काराव-गडब ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन काराव ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील यांनी केले.

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा गडबचे वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. यावेळी सरपंच मानसी पाटील, उपसरपंच मनोज म्हात्रे, सदस्य दिनेश म्हात्रे, मनोहर पाटील, जगदीश कोठेकर, सदस्या भाग्यश्री कडू, वैशाली म्हात्रे, के.पी. पाटील, अध्यक्ष के.जी. म्हात्रे, समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप म्हात्रे, जे.के. म्हात्रे, महेंद्र कोठेकर, एस.वाय. लांगी, मोरेश्‍वर कडू, प्रशांत पाटील, मंगेश पाटील, संतोष म्हात्रे, नामदेव पाटील, अंकुश वाघमारे, शिवम पाटील, ऋषिकेश कडू, रोशन कोठेकर मुख्याध्यापिका रंजना घरत, शिक्षक गायकवाड आदींसह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version