| अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील परहूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जनार्दन परशुराम घरत यांचे वडील परशुराम बारक्या घरत यांचे वार्धक्याने दि.20 डिसेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 90 वर्षे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते सामाजिक व धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घेत असत. त्यांच्या निधनाचे वृत समजताच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्य दर्शन घेतले. तसेच अंत्ययात्रेसाठी पंच्यक्रोशीतील मोठा परिवार उपस्थित होता. त्यांचे दिवसकार्य दि.29 डिसेंबर व उत्तरकार्य दि. 31 डिसेंबर या दिवशी होणार आहे.