। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील गारळ गावचे रहिवाशी तथा तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ सल्लागार पत्रकार आजेश नाडकर यांचे वडील शांताराम कोंडू नाडकर(64) यांचे राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याननिधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा दशक्रियाविधी मंगळवार दि.11 जानेवारी रोजी तर उत्तरकार्यविधी शुक्रवार दि.14 जानेवारी 2022 रोजी रोजी राहते घरी गारळ येथे होणार असल्याची माहिती आजेश नाडकर यांनी दिली आहे.







