शबाना मुल्ला यांना पितृशोक

। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे मोहल्लयातील सामाजिक कार्यकर्त्या व राजिपच्या उर्दू प्राथमिक शाळेतील स्थानिक व्यवस्थापन समितीच्या शिक्षणप्रेमी सदस्या शबाना आसिफ मुल्ला यांचे वडील कासीम अलीसाब अधिकारी (वय 75), रा. मांडलेकर गल्ली, नागोठणे यांचे गुरुवारी (दि.14) रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे दफनविधी येथील कब्रस्तानमध्ये दुसर्‍या दिवशी शुक्रवारी करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात तीन विवाहित मुली सुलताना, शबाना व अनिसा आणि दोन विवाहित मुलगे असिफ व अर्षद, जावई, सुना, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.

Exit mobile version