कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या पाठपुराव्याला यश
| उरण | वार्ताहर |
कामगार नेते महेंद्र घरत यांच्या प्रयत्नांनंतर अखेर सीडब्ल्यूसी कंपनी सुरू होणार असल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते. कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे स्थानिकांचा रोजगार बुडाला होता. कंपनीमध्ये अनेक कंत्राटदार येऊन गले, परंतु ते अयशस्वी झाले. त्यामुळे 2015 पासून ते आजतागायत येथील कामगार बेरोजगार होते.
दरम्यान, दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1984 च्या शौर्यशाली व गौरवशाली लढ्यात पंच हुतात्मे व अनेकजण गोळीबारात जखमी झाले होते, त्यांचे वारस तसेच पागोटे, पाणजे व महाळण परिसरातील 350 प्रकल्पग्रस्त कामगारांना 1987-88 साली रोजगार देण्यात आला होता. परंतु, सीडब्ल्यूसी कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे स्थानिक कामगार व डि.नोडवर अवलंबून असणार्या हजारो प्रकल्पग्रस्त, ट्रक मालक, टेम्पो ओनर्स, चहा टपरी यांचा रोजगार बुडाला होता. कंपनीमध्ये अनेक कंत्राटदार येऊन गेले, परंतु ते अयशस्वी झाले. त्यामुळे 2015 पासुन ते आजतागायत कामगार बेरोजगार राहिले. या कंपनीच्या दिल्ली स्थित अधिकार्यांसोबत गेले अनेक वर्षे संपर्क साधून टेंडरमध्ये बदल करण्याची विनंती केली. त्यानुसार आता Budget CFS Terminal L.td या कंपनीने यशस्वी बोली लावल्यानंतर कंपनी व्यवस्थापकाने कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्याशी संपर्क साधला. कामगार व कंत्राटदार यांच्याबरोबर चर्चेच्या अनेक फेर्यानंतर दोघांनीही सीडब्ल्यूसी कंपनी यशस्वी चालवण्यासाठी व डी.नोडला पूर्वीचे दिवस आणून पुन्हा हजारो प्रकल्पग्रस्तांचा बुडालेला रोजगार मिळवून देऊ, असे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे.
सीएफएसमध्ये प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळवून देणारे दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांना खर्या अर्थाने आदरांजली ठरेल, त्यानुसार कंपनी चालली पाहिजे, कंपनीतील काम सुरळीत चालले पाहिजे, अशा तत्त्वाने एक करार कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी NMGKS संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, कंपनी व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.