मुंबई-गोवामहामार्गप्रश्नी ‘आप’चे आंदोलन
| खास प्रतिनिधी | रायगड |
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने स्वातंत्र्यदिनी एक दिवसाच्या लाक्षणिक आंदोलनाची हाक दिली आहे. या महामार्गासाठी आतापर्यंत तब्बल 15 हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. सदरचा रस्ता एका महिन्यात नकाशाप्रमाणे करुन तसेच नुकसानभरपाई म्हणून रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील प्रत्येकी नागरिकांना प्रत्येकी एक लाख रुपये द्यावेत, अशी प्रमुख मागणी आम आदमी पार्टीचे अॅड. अजय उपाध्येय यांनी केली आहे.
गेल्या 12 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. सध्या या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणे कठीण झाले आहे. अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. याबाबत सरकार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना काही देणेघेणे राहिलेले नाही. याविरोधात आम आदमी पार्टीने 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. या मार्गावर आतापर्यंत 15 हजार 555 कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या खर्चाची समितीमार्फतच चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीदेखील अॅड. उपाध्येय यांनी केली आहे.