सांगोल्यातील चारा छावण्यांची प्रलंबित बिले द्या

आ.जयंत पाटील यांचा औचित्याचा मुद्दा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सांगोला तालुक्यातील 146 चारा छावण्यांना 21 कोटी 47 लाख 14 हजार 922 अनुदानाची रक्कम चारा छावणीना देण्याचे प्रलंबित आहे असा अहवाल तहसीलदार, सांगोला यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आलेली आहे. तरी या चारा छावण्याचे अनुदानापोटी देय असलेली माहे एप्रिल ते ऑक्टोबर 2019 या कालावधीतील अनुदानाची रक्कम राज्य शासनाकडून तात्काळ वितरीत करण्यात यावी, अशी मागणी शेकापचे आ.जयंत पाटील यांनी या औचित्याचा मुद्याद्वारे मागणी केली.

याबाबत बोलताना ते म्हणाले की, सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीच्या अनुषगांने माहे एप्रिल 2019 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत 146 चारा छावण्या सुरू होत्या. सदर चारा छावण्यामध्ये दाखल जनावरांची गुरे छावणी व्यवस्थापन यंत्रणेमध्ये नोंदणी करून आठवड्यातून एकदा बारकोट द्वारे स्कॅनिंग केल्यानंतर ऑन लाईन हजेरीद्वारे अनुदान वितरित करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सदर ऑन लाईन हजेरीप्रमाणे ऑन लाईन हजेरी न लागलेल्या पशु संख्येचे 22 कोटी 54 लाख 27 हजार 299 इतके अनुदान शासनास समपीत करण्यात आले होते.

सदर समर्पीत झालेले अनुदान मिळण्याच्या दृष्टीने मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षते खाली सुधारीत प्रस्ताव सादर करण्याचे कळविले होते, त्या अनुषंगाने समितीच्या निर्णयामध्ये असे म्हणण्यात आले आहे की, ज्या पशुधनाच्या यंत्रणेमध्ये कधीतरी स्कॅनिंगनुसार उपस्थितीची नोंद झाली आहे, त्याची इतर नोंदीच्या आधारे पडताळणी उपस्थितीची संख्या ग्राह्य धरण्यात यावी व त्यानुसार किती निधी देणे आवश्यक आहे हे प्रामिणत करून सुधारीत प्रस्ताव सादर करावा.अशी मागणी त्यांनी केली.

Exit mobile version